10 AUG

कळसुबाई शिखर चढण्याचा एक थरारक अनुभव

महेश विजय वटवटेकर 5 Comments
treaking हा शब्द मुळात खूप वेगळ्या अर्थाने ग्लोरिफाय आणि causal केला गेला, कारण हा शब्द उच्चरताना खूप भारी पण वाटतो आणि तितकाच causal ही केला गेला , प्रतक्ष्यात गड किल्ले किंवा कळसूबाई सारखे कठीण आणि challenging शिखर असो ते सर करताना तेथील दगड -धोंडे,खाचखळगे तुमचा so called बुद्धीमान प्राणी म्हणून असलेला अहंकार माती मोल कसा करतात ते शब्दात सांगणं कठीण आहे, गुरुत्वाकर्षणच्या नियमांना challenge करणे काय😢 असते ह्याच उत्तम उदाहरण कळसूबाई शिखर, हा अनुभव माझ्या साठी आनंददायी,अविस्मरणीय तर होताच तितकाच challengeing पण होता. कारण 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन)हा दिवस माझ्या साठी खूप विशेष आहे तसाच तो ज्यांना ज्यांना लोकशाही प्रिय आहे त्यांना ही आहे, शाळा कॉलेज नंतर मनासारख प्रजासत्ताक दिन साजरा करू शकत नाही ह्याची खंत मागील काही वर्षे पासून होती,ती खंत 360explorer च्या ह्या मोहिमेनी भरून काढली,अस बोलतोय लिहतोय म्हणजे मी😊 एकदमच गांधीगिरी करणार्या पैकी असही काही नाही ,आपल्या देशा प्रति आदर प्रेम तर आहेच पण at the end i m fun party loving guy too, असो मूळ विषयावर येतो,प्रजासत्ताक दिनी (महाराष्ट्रतील एव्हरेस्ट)कळसूबाई शिखरावर आपल्या राज्यघटनेच्या सरनामा चे वाचन 360 explorer मार्फत होणार आणि त्यात साहसी गोष्टींची आवड अशीं संधी सुवर्णसंधी मला सोडायची नव्हती म्हणुन ह्या रेकोर्ड मेकिंग ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी झालो पण जस जशी वेळ जवळ येत गेली अन जाऊ की नको ह्याच दडपण वाढत गेलं कारण माझ्या सोबत येणाऱ्या एका मित्राने अचानक प्लान postpone केला आणी माझी खरी गोची इथे झाली पण मनाची तयारी केली आणि काहीही झाले तरी माघे सरकायचे नाही असा निश्चय केला आणि ह्या मोहिमेत सहभागी झालो, ह्याच मोठया प्रमाणात श्रेय 360 explorer च्या टीम ला आणि आनंद सरांना जाते कारण त्यांचा follow up कॉल अश्यावेळी यायचा जेंव्हा माझ्या मनात ही मोहीम postpond करायचा विचार यायचा त्यामुळे मला ज्यांनी ज्यांनी मला reminder call केला त्यांचे मनकपूर्वक आभार.

Thank You

-महेश विजय वटवटेकर

User Comments

360 Explorer

Reply 1 year Ago

Thank you

Leave A Comment